दिघी औद्योगिक क्षेत्रातील अधिसूचित क्षेत्र एमआयडीसी विकसित करणार June 02, 2020 • RAVI KHADSE दिघी औद्योगिक क्षेत्रातील अधिसूचित क्षेत्र एमआयडीसी विकसित करणार केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रामधील अधिसूचित झालेले क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात मेगा प्रोजेक्ट व परकीय गुंतवणुक करण्यासाठी दिघी औद्योगिक क्षेत्रात उद्योगांकरिता मोठ्या प्रमाणात जागेची मागणी होत आहे. मात्र, महामंडळाकडे पुरेसे क्षेत्र उपलब्ध नसल्याने कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत 12 हजार 140.842 हे.आर क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र सर्व कायदेशिर बाबी तपासून महामंडळामार्फत विकसित करण्याचे ठरले आहे. यादृष्टीने केंद्र शासन व संबंधित विभागास अवगत करण्यात येईल.