‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई


· दुचाकीवर केवळ एका व्यक्तीस प्रवासाची मुभा


· तीन चाकी, चार चाकीमध्ये चालकासोबत दोघांना करता येईल प्रवास


वाशिम, दि. ०४ (जिमाका) : लॉकडाऊन काळात दुचाकीवरून फक्त चालक व खाजगी तीन चाकी व चार चाकीमध्ये चालक आणि इतर २ अशा एकूण ३ व्यक्तींना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळ्यास प्रत्येक व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच वाहन क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास सदर वाहन जप्त करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ जून पासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार खाजगी दुचाकीवरून एका व्यक्तीला म्हणजेच चालकाला प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खाजगी तीन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये चालकासोबत इतर २ व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा आदी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.


Popular posts
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख