‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


मुंबई, दि. ४ : काल दि. ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात जीवित व वित्त हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती असून त्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हास्तरावर सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. या चक्रीवादळामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले असल्यास अशा नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा सविस्तर प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत शासनास पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.


Popular posts
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई