तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०१९ ५ जून पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन June 02, 2020 • RAVI KHADSE तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०१९ ५ जून पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन वाशिम, दि. ०२ (जिमाका) : केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन २०१९ करिता प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी आपले परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ५ जून २०२० पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे. खेळाडूंची मागील तीन वर्षातील म्हणजेच २०१७, २०१८ व २०१९ मधील कामगारी असावी. जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील साहसी उपक्रमांचा समावेश असावा. तसेच खेळाडूंची कामगारी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असून त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानांमध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, वृत्तपत्राची कात्रणे सोबत जोडणे अत्यावश्यक आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शेटीये यांनी कळविले आहे.