पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा - उपमुख्यमंत्री अजित पवार

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई दि. 26 - देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्यं योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या कुटुंबांनं केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्वंविकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्नं हे सारं अलौकिक आहे. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.


Popular posts
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई