माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन


मुंबई, दि. 21 : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे. देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या वाटचालीतील राजीवजींचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृती दिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या. त्यासाठी अविरत प्रयत्न करणे, हीच राजीव गांधींना श्रद्धांजली ठरेल.