वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक काशीराम  उबाळे यांचा अपघाती मृत्यू 


वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक काशीराम  उबाळे यांचा अपघाती मृत्यू 


* मातंग समाजाचा ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला


* मातंग समाजामध्ये सर्वत्र दुःखाचे आसूड


वाशिम दि.12 (जिल्हा प्रतिनिधी) वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक काशीराम उबाळे रा. नंधाना ता. रिसोड यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली.


            काशिराम ऊबाळे हे काही कामानिमित्त शिरपूर जैन येथे येत असता दरम्यान त्यांचा चांडस पांगरखेडा मार्गे शिरपूर येथे येत असतांना त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 37 एक्स 1178 अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, मेंदूला आणि डोळ्याला अतिप्रमाणात मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने वाहन चालक रमेश मोरे हे घटनास्थळी पोहोचले. अपघात नेमका कसा घडला याची शहानिशा करून पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशन करीत आहे.


Popular posts
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई