विविध क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन

 


विविध क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन


वाशिम, दि. १२ (जिमाका) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत सन २०१९-२० साठी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार,द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव २६ मे २०२० केंद्र शासनाच्या क्रीडा संचालनालयाकडे सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी कळविले आहे.


या पुरस्काराविषयीची सविस्तर माहिती, नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मिलिंद काटोलकर (भ्रमणध्वनी क्र. ९९७५५९११७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  श्री. शेटीये यांनी केले आहे.