दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती May 21, 2020 • RAVI KHADSE दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थितीमुंबई दि. 21 : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने मंत्रालयामध्ये परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्षधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.