श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. सोसायटीच्या वाशिम जिल्ह्यातील ठेवीदारांना आवाहन May 21, 2020 • RAVI KHADSE श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. सोसायटीच्या वाशिम जिल्ह्यातील ठेवीदारांना आवाहन वाशिम, दि. २१ (जिमाका) : श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. ऑप सोसायटी लि. लासलगावचे संचालक सतीश पोपटराव काळे व इतर सहा आरोपींनी मंगरूळपीर शाखेत अपहार केल्याच्या फिर्यादीवरून मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे अप. नं. २६९/१८ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाशिम आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्याच्या संबंधाने वाशिम जिल्ह्यातील ज्या ठेवीदारांची श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. ऑप सोसायटी लि. लासलगाव, जि. नाशिकच्या वाशिम जिल्ह्यातील विविध बँक शाखांकडून फसवणूक झालेली आहे, अशा ठेवीदारांनी ५ जून २०२० रोजी पर्यंत संबंधित सर्व कागदपत्रांसह वाशिम आर्थिक गुन्हे शाखा येथे समक्ष येवून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन वाशिम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. या गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक ९८२२००६८५४ असा आहे.